Share

वीज बिल तक्रारीची दखल न घेणे महागात; सहायक अभियंत्यासह ४ कर्मचारी निलंबित

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वीज बिल तक्रारीची दखल न घेणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना चांगलच महागात पडलं आहे. कामात अनियमितता व निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून महावितरणच्या जिंतूर ग्रामीण शाखेच्या एका सहायक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, १० मार्च रोजी परभणी जिल्ह्यात थकबाकीसाठी महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद येथील पाच पथकाने वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची फेरतपासणी केली. यावेळी जिंतूर शाखा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चारठाणा भागात सॉमिल आणि पिठाच्या गिरणीमध्ये अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी गुन्हा नोंद करणे इत्यादी कार्यवाही न केल्याने येथील महावितरण सहायक अभियंता विनायक उत्तमराव दिग्रसकर यांना अधीक्षक अभियंता परभणी यांनी निलंबित केले.

त्याचप्रमाणे जिंतूर ग्रामीण शाखा कार्यालय परिसरात पिठाची गिरणी आणि सॉमिल या ठिकाणी अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू असल्याप्रकरणी तसेच चारठाणा, पाचलेगाव येथे अनधिकृतपणे मोठया प्रमाणात आकडे आढळून आल्याने प्रधान तंत्रज्ञ आत्माराम, दत्तराव ननवरे, वरिष्ठ तंत्रज्ञ अब्दुल रहेमान अब्दुल हमीद, विद्युत सहायक खुशाल ज्ञानदेव कऱ्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!