🕒 1 min read
औरंंगाबाद : गेल्या पाच ते सहा महिन्यापासून शहर परिसरात वाहनचोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. वाढत्या वाहनचो-यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून पोलिसांनी वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त वाहनधारकातून करण्यात येत आहे.
दरम्यान, चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून आणखी तीन दुचाकी लंपास केल्या आहेत.
गोपाल गजानन धायडे (वय २९, रा.नारळीबाग) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२८-बीसी-१७३५) चोरट्याने ५ मार्च रोजी घरासमोरून चोरून नेली. दुसNया घटनेत, पाशा खान सादत खान (वय ६०, रा.गारखेडा परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एएफ-७११८) चोरट्याने जाफरगेट जवळील एका पेट्रोलपंपाजवळून चोरून नेली. ही घटना ७ मार्च रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास घडली.
तिसNया घटनेत, हरिश्चंद्र भाऊलाल घुनावत (वय ५६) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीके-०९३२) चोरट्याने सिडको परिसरातील एका हॉटेलसमोरून चोरून नेली. ही घटना २८ पेâब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. विविध भागातून दुचाकी लंपास करणा-या चोरट्यांविरूध्द अनुक्रमे क्रांतीचौक-२ आणि सिडको-१ असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
