🕒 1 min read
उत्तर प्रदेश : युपीतील शामली गावात एका तरूणाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वःताच लग्न लावून देण्याची मागणी केली आहे. यावर त्याची अशी तक्रार आहे कि, त्याची उंची २ फूट असल्याने त्याला नवरी मिळत नाही. यासाठी त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मदतीसाठी आवाहन केलं आहे.
शामलीच्या जनपद भागात राहणारा २६ वर्षीय तरूण मोहम्मद अजीम याची उंची कमी आहे. अजीम गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नाबाबत चिंतेत आहे. तो सतत लोकांना त्याचं लग्न लावून देण्याची मागणी करत आहे. हा तरूण महिला पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने मागणी केली की, मॅडम माझं लग्न लावून द्या. मी कधीपर्यंत एकटा राहू. त्याची उंची दोन फूट असल्याने त्याला नवरी मिळत नाही आणि नवरी मिळाली तरी घरातील लोक लग्न लावून देत नाहीत.
आता मात्र या कंटाळून अजीमने शामलीच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून लग्न लावून देण्याची मागणी केली आहे. तो म्हणाला की तो महिला पोलीस स्टेशनसोबतच एसडीएम आणि कोतवालाकडे जाऊनही त्याने लग्न लावून देण्याबाबत सांगितलं आहे. पण त्याची मागणी पूर्ण झालेली नाही. लग्नाच्या मागणीमुळे हा तरुण चर्चेत आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मदतीसाठी आवाहन केल्यानतर आता तरी या तरुणाचे लग्न होईल का हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लंपट मंत्र्यांना राज्य सरकारनेच अभय देऊन पाठीशी घातले की खालच्या स्तरावर हेच नशिबी येणार !’
- ‘चंद्रकांतदादा तुम्ही सरकारविरोधात अविश्वास ठराव आणून दाखवाच, मग तुम्हाला समजेल…’
- १ ली ते ११ वी सगळेच पास; राज्यपालांनी दिली मान्यता
- स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
