Share

स्वराज्याला ७५ वर्ष झाली, सुराज्य आलं का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

Published On: 

मुंबई : ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत करण्यात आला होत. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यात हा उत्सव सुरु होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जातपात, धर्म या पलिकडे जाऊन देशाप्रती भावना दाखविली. अनेकांनी कुर्बांनी पत्करली. त्यांचे हौतात्म आठवण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा.

‘स्वातंत्र्य दिनाचा नुसता उत्सव नाही. तर हा जात, पात, धर्म या पलीकडे जाऊन देशा प्रति आपल्या सगळ्यांच्या भावनांचा सन्मान आहे. ७५ वर्ष पूर्ण करत आहोत. कुर्बानीची पण आठवण ठेवत आहोत. जे शहीद झाले त्यांची आठवण काढतो पण तितकंच मर्यादित नाही. त्यांनी बलिदान केलं आहे. त्यांना अभिमान वाटेल अस जगणं असा देश उभा करू शकलो का’ हा प्रश्न आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य आहे.’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘स्वराज्य आधी की सुराज्य आधी हा मुद्दा होता. आता स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का? याचा विचार कोण करणार. आज हे मैदान निशब्द आहे. कुर्बानी देऊन हे स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या पिढीला आयतं मिळालंय. त्याचे रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. स्वातंत्र्याचे तेज जपले पाहिजे. हे मैदान बोललं पाहिजे, तो इतिहास जिवंत करणार स्मारक इथे झालं पाहिजे,’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!