कोल्हापूर : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर, राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं होतं. आता ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे.
दरम्यान, ज्या खात्यामुळे(आपत्ती निवारण विभाग) परीक्षा पुढे ढकलण्यात आली त्या विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगत मला न विचारताच हा निर्णय झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं.
‘महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही’ अशी टीका त्यांनी केली होती. आता, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणावा, त्यानंतर त्यांना समजेल की तिघांची आघाडी किती भक्कम आहे,’ असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. त्यामुळे, पाटील विरुद्ध मुश्रीफ असा कलगीतुरा अजूनही सुरु असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरींवर काँग्रेसने केला कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप !
- महाराजांनी अनावधानाने घेतले चुकीचे नाव, माजी आमदाराने केला नावातच बदल
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

