मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यात गेल्या काही महिन्यांत झालेल्या गंभीर प्रकरणांवर भाष्य केलं आहे. चित्रा वाघ यांनी लातूरमधील एका सामान्य महिलेवर समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्याने लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणावर भाष्य करत त्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. समाज कल्याण विभागाचा कारभार असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.
आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील याबाबत ट्विट करत नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ‘अनुकंपातील नोकरी देण्यासाठी लातूर मधील समाज कल्याण अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे… लंपट मंत्र्यांना राज्य सरकारनेच अभय देऊन पाठीशी घातले की खालच्या स्तरावर हेच नशिबी येणार…’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अनुकंपातील नोकरी देण्यासाठी लातूर मधील समाज कल्याण अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे… लंपट मंत्र्यांना राज्य सरकारनेच अभय देऊन पाठीशी घातले की खालच्या स्तरावर हेच नशिबी येणार… pic.twitter.com/DwjVWiambm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 12, 2021
काय आहे हे प्रकरण ?
चित्रा वाघ यांनी एका तरुणीची रेकॉर्डिंग पत्रकार परिषदेत सादर केली. ‘माझे वडील हे जीवनविकास प्रतिष्ठान मतिमंद शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांचे २००७ मध्ये निधन झाले. २००७ ते २०१२ या काळात या माझ्या आईने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांची भरती केली नाही. त्यानंतर २०१७ ते २०२१ याकाळात नियुक्ती देण्यात यावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र, लातूरचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी टाळाटाळ केली.’ असं या तरुणीने सांगितले.
‘पुढे खमितकर यांनी, तू गरीब आहेस. तुझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणून जाण्यास सांगितले. यानंतर २२ जानेवारी २०२१० रोजी या अधिकाऱ्याने शारीरिक संबंधाविषयी मला विचारणा केली. तो पर्यंत तुला नियुक्ती देणार नाही अशी धमकी देखील दिली. यानंतर मी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे मदत मागण्यास गेले असता दोन वेळा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसेच, पुन्हा धमकावले. मी देखील एक महिला आहे, मला न्याय मिळावा,’ असं भाष्य या तरुणीने सदर रेकॉर्डिंग मधून केलं आहे.
यानंतर चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘एका पिडीतेला शरीरसुखाची मागणी करण्याची या अधिकाऱ्यांची कशी हिंमत होते. हे असे अधिकारी समाज कल्याण विभागात बसलेत. सामाजिक न्याय विभागात नक्की कोणाचा कित्ता गिरवला जातोय ? कोणाचा धडा शिकवलं जातोय?’ असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं आहे.
‘श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये बाईला शरीर सुखाची मागणी केली जाते ? ज्यावेळी ती न्याय मागायला गेली तेव्हा पोलिसांनी अगदी तत्परतेने तिच्यावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. इतकच नाही तर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनने नोटीस बजावताना या महिलेच्या नावापुढे त्या खमितकर याच आडनाव टाकलं. सदर महिलेने प्रधान सचिव, सामाजिक न्याय, विशेष साहाय्यक विभाग , मंत्रालय, मुंबई यांना शपथपत्र लिहून ही बाब सांगितली आहे,’ असं सांगत या मुजोर अधिकाऱ्यांवर वेळीच कठोर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरींवर काँग्रेसने केला कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप !
- ‘चंद्रकांतदादा तुम्ही सरकारविरोधात अविश्वास ठराव आणून दाखवाच, मग तुम्हाला समजेल…’
- १ ली ते ११ वी सगळेच पास; राज्यपालांनी दिली मान्यता
- स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
- ऐकावं ते नवलचं ! हौश्याने बैलाचा वाढदिवस केला धुमधडाक्यात साजरा; पोलिसांनी केली कारवाई !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

