Share

आरक्षण निर्णयाचा शासनावर दबाव असल्यामुळे परीक्षा लांबणीवर

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : राज्यात १४ मार्चला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाचे कारण देऊन या परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी मराठा आरक्षण निर्णयाचा दबाव शासनावर असल्यामुळे वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याचे खळबळजनक वक्तव्य आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले. वर्षभरापासून तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. तसेच एमपीएससीने तात्काळ परीक्षा घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यशासन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय होई पर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही. सरकारने मराठा आरक्षण विषयक धोरण पुढे करुन थोपवून धरु नये. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांमधून असंतोष उद्रेक होण्याची वाट न पाहता शासनाने एमपीएससी परीक्षा वेळेत घ्याव्यात आणि आगामी वर्षाच्या जाहिराती पण द्याव्यात असे आवाहन दीपक कदम यांनी केले आहे.

विशेष म्हणजे सन २०२० मध्ये यूपीएससी राष्ट्रीय स्तराच्या पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यात आल्या आहेत. यूपीएससी- २०२० मुख्य परीक्षा निकाल प्रतीक्षेत आहे. विद्यार्थी मुलाखतीची तयारी करीत आहेत आणि एमपीएससी- २०२० ची पूर्व परीक्षा अजून झाली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न उपस्तित होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भरकटत चालला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!