Share

परभणीमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

Published On: 

परभणी : जिंतूर रस्त्यावरिल 132 केव्हीमधील सिटी फुटल्यामुळे गुरुवारी सायंकाळ ते रात्रीपर्यंत अर्धे अधिक शहर अंधारात बुडाले होते.
दरम्यान महावितरण तसेच महापारेषणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी वीजपूरवठा सूरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते. कोराेना तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये मात्र शहरातील अनेक भागांमधील वीज गुल झाल्याने बच्चे कंपनी मात्र खुप नाराज झाले होती.

गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गेलेली वीज रात्री दहा वाजेपर्यंत आली नव्हती. साडेदहा अकरा वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी अचानक सहाच्या सुमारास शहरातील स्टेडियम, गव्हाणे रोड, जिंतूर रोड, दर्गा परिसरातील वीज पुरवठा बंद झाला होता. तो साडेनऊ वाजेपर्यंत आले नव्हते. तर दरम्यान अर्धेअधिक शहर अंधारात बुडल्याची महिती समोर आली आहे.

33 केव्ही सबस्टेशनमध्ये काहीतरी बिघाड झाल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता रूपेश चापके, अभियंता क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी बी. बी. रेंगे, किशोर गायकवाड यांच्यासह अन्य कर्मचारी युद्धपातळीवर वीजेचा पुरवठा सुरु करणे तसेच दुरुस्त करण्यासाठी रात्रीउशीरापर्यंत करत होते. यावेळी महापारेषण विभागाचे कार्यकारी अभियंता अकोसकर यांच्यासह अन्य महावितरण विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी दुरुस्ती करत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!