परभणी : पाकिस्तानमधून भारतामध्ये कुटूंबाच्या शोधामध्ये आलेली गीता वाघमारे सध्या परभणी येथे सांकेतीक भाषेचे शिक्षणाचे धडे गिरवत आहे. जिंतूर येथील पहल नावाच्या संस्थेचे डॉ. अनिकेत सेलगावकर यांच्याकडे ती सध्या निवास करते. तीन महिण्यापासून ती परभणीमध्ये वास्तव्यास आहे. तीन – चार महिण्यात ती सांकेतीक भाषेचा कोर्स पूर्ण करेल असे पहल संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानमधून आलेल्या मुकबधिर गीताचे आपण पालक असल्याचा दावा मात्र जिंतूर येथील एका कुटूंबाने या वेळी केलेला आहे. या दाव्यानंतर गीतासह संपूर्ण चमू जिंतूर येथे गेला होता. तेथे वाघमारे कुटूंबियांची भेट घेवून तपासणी देखील करण्यात आली. पण गीताला त्या कुटूंबाबाबत राहिल्याबद्दल काहीही आठवत नाही, असे गिताने सांकेतीक भाषेमध्ये सांगितले. त्यामुळे पालक असलेल्या कुटूंबाकडे जाण्यास तीने नकार दिला आहे. त्यामुळे आता डीएनए चाचणी केल्यानंतर गीताला वाघमारे कुटूंबियांकडे दिले जावे असा निर्णय पहल या संस्थेच्या चमूने घेतला होता.
सांकेतीक भाषेचे धडे गिरवतेय गीता
सध्या गीता ही परभणी येथे डॉ. सेलगावकर यांच्या पहल संस्थेमध्ये राहत आहे. त्या ठिकाणी तीन महिण्यापासून सांकेतिक भाषेचा सराव करत आहे. स्वत: सेलगावकर हे गीताला सांकेतीक भाषा शिकवतात. या माध्यमातून गिताला लोकांसोबत कसे वागावे तसेच व्यवहार ज्ञान मिळावे तसेच तीला स्वता:चे बॅंक खाते काढणे तसेच स्वत:ची स्वाक्षरी पण करता यावी यासाठी पहल ही संस्था खुप प्रयत्न देखील करत आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयानंतरच विचार करणार
गीताला पाकीस्तानमधून भारतात आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री (कै.) सुषमा स्वराज यांचे खुप मोठे योगदान लाभले. सध्या तीची संपूर्ण माहिती देखील परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे. गीताला भारतीय नागरीकत्व पण मिळाले आहे. परंतू तिच्या कुटूंबाचा शोध घेत असताना तीची फसवणूक होऊ नये यासाठी परराष्ट्र मंत्रालय तसेच पहल संस्था देखील चांगली काळजी घेताना दिसते. परराष्ट्र मंत्रालयाकडे गीता व तीचे कुटूंब असल्याचा दावा करणाऱ्यांची डीएनए चाचणी पूर्ण झाल्याशिवाय पुढे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही अशी माहिती पहल या संस्थेचे डॉ. अनिकेत सेलगावकर यांनी या वेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
