🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले. त्यानंतर थोड्याच वेळात याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडण्यास सुरुवात झाली होती.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जनतेला संबोधन करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले कि MPSC परीक्षेची तारीख कोणत्याही परीस्थित उद्याच जाहीर होईल. तसेच तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिलेल्या आहेत. उद्या जाहीर करण्यात येणारी तारीख ही पुढच्या आठ दिवसातीलच आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
‘विद्यार्थ्यांनी धीर सोडू नये परीक्षा काही फार काळासाठी पुढे गेलेली नाही आहे. उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोरोनाचा हाच कारण आहे. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय पासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधने यासाठी काम लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार.
कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाची आहे. ज्यांना लस दिली गेलीय तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नव्हे तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत.’ असे मत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : MPSCची तारीख उद्या जाहीर होणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
