🕒 1 min read
औरंगाबाद : महापालिकेने नवीन रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांना गती देताच शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येने एकदमच उच्चांक गाठला आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल ५५० नवीन रूग्ण आढळले. तर बुधवारी जिल्ह्यात कोरोनाच्या ५३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. मनपाच्या फिरत्या पथकाने केलेल्या ४४४ व्यक्तींची अॅन्टिजेन चाचणीतून तब्बल १०१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. पालिकेच्या फिरत्या पथकांचा ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर असल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांत एवढे रूग्ण निघाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात आदेशाचा जाणीवपूर्वक भंग करणार्यांवर थेट आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात कोरोना संसर्ग पसरत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी पालिकेने रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह निघणाऱ्यांवर वेळीच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी दहा फिरती पथके मंगळवार (दि.९) पासून शहरात कामाला लावली आहेत.
या पथकांनी पहिल्याच दिवशी कोरोना रूग्णांच्या संपर्कातील ४४४ व्यक्तींची अॅन्टिजेन चाचणी केली. त्यातून तब्बल १०१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी दिवसभरात तब्बल ५५० नवीन रूग्ण आढळले.
पैकी ४६२ रूग्ण हे केवळ शहरातील आहेत. बुधवारी जिल्ह्यात कोरोनाच्या ५३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ४४३ रुग्णांचा समावेश आहे. यावरून औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग आता अधिक गतीने पसरू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारने MPSCच्या विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय : राम सातपुते
- परभणीमध्ये कुऱ्हाडीने मारहाण करून पायाची बोटे तोडली
- MPSC परीक्षा पुढे ढकलून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार – शिवसंग्राम
- जायकवाडीची पाणीपट्टी थकवणाऱ्या औरंगाबाद ‘मनपा’वर कारवाई करणार कोण?
- विनामास्क फिरणार्याकडून महापालिकेच्या कर्मचार्यास मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
