परभणी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री आमदार सुरेश वरपुडकर व त्यांचे कुटूंबीय हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे आढळून आले आहे. या वेळी कोरोना चाचणी केलेल्या चाचणीतून ही बाब समोर आल्याचे समजले आहे. वरपूडकर यांच्या कुटूंबातील चार जण पॉझिटिव्ह आल्यामुळे चौघेही उपचार घेत आहेत. तर आता दहा दिवसतरी औषधोपचार चालणार आहे.
आमदार सुरेश वरपुडकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून गुरुवारी दुपारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याची अधिकृत माहिती दिली आहे. या मध्ये त्यांच्या पत्नी मीना वरपुडकर यांची कोरोना चाचणी केली आसता, त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी केली. त्यात आपण स्वतः, स्नूषा प्रेरणा वरपुडकर व नातू युद्धराज असे हे चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
याचबरोबर दुसरा नातू रणवीर व मुलगा समशेर वरपुडकर हे काही दिवसांपासून आमच्या संपर्कात नसल्याने त्यांना सुदैवाने कोरोनाची लागण झाली नसल्याचेही त्यांनी त्यात म्हटले आहे. दरम्यान, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही चौघेही उपचार घेत असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रसार तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तर त्यांच्या गटामध्ये यामुळे अस्वस्थता पसरली आहे. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय घडामोडीचे प्रमुख स्त्रोत हे वरपूडकर असल्याने आता राजकीय घडामोडी थांबतात की पुन्हा वेगाने होतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
