🕒 1 min read
मुंबई : एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यभरातील लाखो युवक-युवती अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक वर्षी एमपीएससीच्या परीक्षा देत असतात.
दरम्यान, 14 मार्चला नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्याने निर्बंध लावले आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप ही परीक्षा कधी घेण्यात येणार आहे याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही.
आता,नुकतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी एमपीएससीकडून टोल फ्री- हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! येथे एलपीजी सिलिंडर बुक करा आणि मिळावा 100 रुपयांपर्यंत स्वस्त सिलिंडर
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?

