नवी दिल्ली : आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्या कंपन्यादेखील त्यांच्या कार्सवर अधिकाधिक डिस्काऊंट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात ह्युंदाय इंडिया कंपनी आघाडीवर आहे.
आता पुन्हा तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कोरियाई ऑटोमेकर कंपनी हुंदाईने आपल्या काही निवडक कार्सवर मार्च महिन्यात बंपर डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनी सँट्रो ,ऑरा, इलेन्ट्रा आणि कोना ईवी यांसारख्या कार्सवर 1.5 लाख रुपयांची सूट देत आहे. हा डिस्काउंट एक्सचेंज ऑफर आणि कॅशशिवाय लॉयल्टी बोनसच्या रुपातही आहे.
हुंदाई इंडिया आपल्या कोना ईवी कारवर 1.5 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. कंपनी एन्ट्री लेवल कार सँट्रोवर 50 हजार रुपयांची सूट आहे. काही कार्सवर 30 हजार रुपयांचा कॅश बेनिफिट मिळतो आहे. तसंच ऑरा, या कारवर 70 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. नॉइज कार्सवर 60 हजार रुपयांचा डिस्काउंट असून त्यात 45 हजार रुपये कॅश डिस्काउंट आहे. तसंच यात 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉरपोरेट डिस्काउंट सामिल आहे. कंपनीची ही ऑफर मार्च 2021 च्या शेवटपर्यंत आहे. कंपनी सर्वाधिक विक्री होणाऱ्या हुंदाई आय 20, व्हर्ना ,क्रेटा , हुंदाई व्हेन्यू या गाड्यांवर कोणताही डिस्काउंट नाही.
दरम्यान, जुनी कार स्क्रॅप करुन नवी कार घेण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जुनी कार स्क्रॅप करण्याच्या बदल्यात नवं वाहन खरेदी करणाऱ्या कंपन्या ग्राहकांना जवळपास 5 टक्के सूट देतील असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. यावर्षी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जुन्या वाहनांना स्वच्छेनं स्क्रॅप करण्याचं धोरण केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. या धोरणानुसार खासगी वाहनं स्क्रॅप करण्याची मर्यादा 20 वर्षे, तर व्यावसायिक वाहनांना स्क्रॅप करण्याची मर्यादा 15 वर्षे आहे.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! येथे एलपीजी सिलिंडर बुक करा आणि मिळावा 100 रुपयांपर्यंत स्वस्त सिलिंडर
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
