🕒 1 min read
रायपूर : भारतीय क्रिकेटचा महान फंलदाज सचिन तेंडुलकर हा सध्या रायपुर येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सचिन तेंडूलकर हा भारतीय लिंजड संघाचे नेतृत्व करत आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकरची एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. पीळदार शरीरयष्टी ठेवणं सध्याचा ट्रेंडच आहे. आता भारतीय संघाचा मास्टरब्लास्टर माजी फलंदाज सचिन तेंडुलकरलाही पीळदार शरीरयष्टी करण्याची इच्छा झालीय.
पण सचिनची ही इच्छा जागी होण्यामागे इंग्लंडच्या एका माजी गोलंदाजाचा हात आहे. इंग्लंडचा ३९ वर्षीय माजी वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रीमलेटची पीळदार शरीरयष्टी पाहून सचिन देखील खूप खूश झाला आहे. सचिननं ट्रीमलेटसोबतचा जिममध्ये ट्रेनिंग करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
How many OMELETTES would I need to eat to look like TREMLETT? ???? ????
मुझे TREMLETT जैसे बनने के लिए कितने OMELETTE ???? खाने पड़ेंगे?? ???? https://t.co/jGa4mCgA8L
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 10, 2021
सचिननं ख्रिस ट्रीमलेटच्या शरीरयष्टीचं कौतुक तर केलंच. पण ट्रीमलेटसारखी शरीरयष्टी करण्यासाठी मला किती ऑम्लेट खावे लागतील?, अशी मिश्किल टिप्पणी देखील केली आहे. सचिन तेंडुलकरचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! येथे एलपीजी सिलिंडर बुक करा आणि मिळावा 100 रुपयांपर्यंत स्वस्त सिलिंडर
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
