नागपूर : सप्टेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढून 1710 वर गेल्याने चिंता वाढली आहे. हा कोरोनाचा उद्रेक असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे, ही संख्या आणखी वाढणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1,62,053 झाली असून आज 8 रुग्णांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या 4415 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, बुधवारी 10548 चाचण्या झाल्या. त्या तुलेनत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 16.21 टक्के झाले आहे.
त्यानुसारच आता नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांना शहरात कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून दारूचे दुकाने आणि हॉटेल पूर्णपणे बंद राहणार असून, दारू आणि जेवण यांची ऑनलाई विक्री सुरु राहनार आहे. तर २१ तारखेला कोरोनाची पुढची स्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल अस नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नागपूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तर होम क्वारंटाइन असणाऱ्यांनी बाहेर न पडण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे खासगी कार्यालये पूर्णपणे बंद असणार असून सरकारी कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर, आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने त्या कामासंदर्भात असणाऱ्या खासगी, शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पळून कार्यालय सुरु ठेवण्यास मुभा दिली आहे. कोरोना लसीकरण मात्र सुरळीत सुरु राहणार असून लसीकरणासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या वाहतुकीची व्यवस्था त्या भागातील नगरसेवकांनी करण्याची सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! येथे एलपीजी सिलिंडर बुक करा आणि मिळावा 100 रुपयांपर्यंत स्वस्त सिलिंडर
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?

