🕒 1 min read
मुंबई : जान्हवी कपूरचा ‘रूही’ हा सिनेमा आज 11 मार्चला रिलीज झालाये. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने कुठलीही कसर सोडली नाही. एका दिवशी अगदी दोन-दोन, तीन-तीन इव्हेंट केलेत. इतकेच काय, अगदी गाडीत ड्रेसही चेंज केला. होय, वेळेअभावी जानूवर कारमध्येच कपडे बदलण्याची वेळ आली. खुद्द जान्हवीने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आता हा सगळा खटाटोप कशासाठी? तर प्रमोशनल इवेंटनंतर लगेच जान्हवीला फ्लाइट पकडायची होती. त्यामुळे तिला कॅज्युअल कपडे परिधान करायचे होते. पण हाताशी वेळ नव्हता. अखेर तिने कारमध्येच कपडे बदलून कशीबशी फ्लाईट पकडली.
निर्माते दिग्दर्शक बोनी कपुर व श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने आपल्या नवीन चित्रपटातील आपला लूक शेअर केला आहे. नेहमी ग्लॅमरस अवतारात दिसणारी जान्हवी मात्र या चित्रपटात चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा लुक पाहुन प्रेक्षकांचा थरकाप उडल्या शिवाय राहणार नाही. दिनेश विजन यांच्या ‘रुही’ या नविन चित्रपटात जान्हवी चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेश विजन यांनी याआधी ‘स्त्री’ हा हॉरर चित्रपट बनवला होता.
https://www.instagram.com/p/CMPTuYTgo5X/?utm_source=ig_web_copy_link
‘स्त्री’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता राजकुमार राव हा या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रुही हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शीत होणार आहे. ‘रूही’ची कहाणी ही एका चेटकिणीची आहे. या चेटकीणीची नजर लग्न सोहळा असलेल्या घरांवर आहे. लग्नानंतर नवरदेव झोपला की, ही चेटकीण नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते.
चित्रपट प्रदर्शनाआधी जान्हवीने या सिनेमातील तिचा ‘भूत लूक’ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये जान्हवीशिवाय राजकुमार राव आणि वरूण शर्मा दिसतात. व्हिडीओच्या सुरुवातीला राजकुमार दिसतो, मग वरूण शर्मा आणि यानंतर जान्हवी. नववधूच्या वेशात आरशासमोर तयार होत असलेली ही जान्हवी पाहून अंगाचा क्षणभर थरकाप उडतो.
महत्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

