Share

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉचा क्रांतिकारी निर्णय; हुंडा घेणाऱ्यांचा विवाह लावण्यात येणार नाही

Published On: 

मनमाड : अहमदाबादमधील आयशा खान आत्महत्या प्रकरणामुळे हुंडा परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक महिलांचे आयुष्य उद‌्ध्वस्त करणारी ही परंपरा मोडण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्डाने पुढाकार घेत जबरदस्ती किंवा हुंडा घेणाऱ्यांचा विवाह न लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा सूचना देखील काझी व इतर मंडळींना दिल्या आहेत.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफूज रहेमानी यांनी दहेज पद्धत समाजाला घातक असल्याचे नमूद केले. इस्लामने अगदी साध्या व सोप्या पध्दतीने निकाह करण्यास मान्यता दिली आहे. मात्र या पद्धतीचा अवलंब न करता समाज विघातक पद्धतींने आपलेसे केले जात आहे. हुंडा विरोधात प्रबोधन करणे काळाची गरज त्यांनी व्यक्त केली. लग्नामध्ये होणारा अधिक खर्च टाळून करून साध्या पद्धतीने  कमी खर्चात विवाह करण्यासंबंधी आता जनजागृती करण्यात येणार आहे.

याबाबतची राज्यभर मोहीम देखील ११ ते २० मार्च दरम्यान राबविली जाणार आहे. याबाबतची ऑनलाईन बैठक झाली असता यात राज्यभरातील ३५ जिल्ह्यांच्या ४०० मुस्लीम मुफ्ती, काझी, मौलाना आदी धर्मगुरुंनी हुंडा परंपरे विषयी दीर्घ चर्चा केली.
हुंडा विरोधात प्रबोधन करणे काळाची गरज त्यांनी व्यक्त केली. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून चालविण्यात येणारी या मोहिमेचे कौतुक होत असून, या निर्णयामुळे महिलांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

यामुळे आजही चालू असलेलेया अनिष्ट रूढी परंपरा थांबण्यास मदत होईल. तसेच या मोहिमेला सुरुवात झाली की आपोआपच जनजागृती होईल. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून चालविण्यात येणाऱ्या या मोहिमेचे कौतुक होत असून, या निर्णयामुळे महिलांना नक्कीच दिलासा मिळणार आहे, असे सईदा रहेमानी यांनी म्हटलं आहे. या निर्णयाचे मुस्लीम महिलांमधून स्वागत करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!