Share

उस्मानाबादेत दररोज दोन हजार चाचण्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Published On: 

उस्मनाबाद: राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आरोग्य विभागाने दररोज ८०० ते दोन हजार लोकांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत.

यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आली आहे. सरकारी दवाखान्यांसोबतच शहरातील खासगी दवाखाने, प्रयोगशाळेसाठी जिल्हा परिषद तसेच नगरपालीकामधील विस्तार अधिकाऱ्यांचीनेमणूक करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची अँटिजेन, आरटीपीसीआर चाचणी सक्तीने करण्यात यावी आणि चाचणी केल्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा रुग्णालयाकडे सादर करावे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर ग्रामीण भागातील कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी असणार आहे तसेच शहरातील रुग्णांची जबाबदारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर असणार आहे. कोरोना केअर सेंटर्स सुरु करण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. विलगीकरण करावे लागले तर त्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यातबाबत आदश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!