🕒 1 min read
नवी दिल्ली – दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी जीवनयात्रा संपवली होती. मरिन ड्राईव्ह परिसरातल्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये जीवनयात्रा संपवली होती. मात्र, त्यांनी जीवनयात्रा का संपवली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मोहन डेलकर यांनी गुजराती भाषेत सुसाइड नोट लिहून जीवनयात्रा संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डेलकर हे लोकसभेतील दादरा आणि नगर हवेली मतदार संघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. मोहन डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर आणि दोन मुले अभिनव व दिविता असा परिवार आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधी पक्षाच्या खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक निवेदनही दिले. सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे असं सुळे यांनी म्हटलं आहे.
सातवेळा खासदारकी भूषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी केली. दरम्यान भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ते उपाय योजण्याची गरज आहे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्रात सुचवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सध्या सर्वांना नोकऱ्या मिळणे अशक्य, शिवसेना नेत्याची कबुली
- माझ्या वडिलांनी ऊस तोडला, मजुरांच्या व्यथा मी जाणतो-धनंजय मुंडे
- वय वर्षे ५७, ‘हा’ अभिनेता नवरोबा म्हणून पाचव्यांदा बसला घोड्यावर
- खा.जलील यांच्या कार्यालयामागील इमारत जमीनदोस्त
- रुग्णसंख्या वाढली! सोयगावचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
