Share

कोविड सेंटरमध्ये रूम देण्याच्या कारणावरून रुग्णांची नोडल अधिकाऱ्यांना मारहाण

Published On: 

🕒 1 min read

जालना : कोविड केअर सेंटरमध्ये रुम देण्याच्या कारणावरून कोरोना पॉझिटिव्ह पेशंटने सेंटरमधील अधिकांऱ्याना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना शहरातील वन प्रशिक्षण केंद्राच्या कोविड सेंटरमध्ये ६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सलीम मोहम्मद सय्यद, नासीर मोहम्मद सय्यद अशी दोन जणांची नावे असून, एक जण अनोळखी आहे.

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या सलीम मोहम्मन नासीर याला वन प्रशिक्षण केंद्राच्या कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्या रूममध्ये असलेले संदीप वाघ यांच्यासोबत त्याने वाद घातला. या प्रकाराची वाघ यांनी तहसीलदारांना माहिती दिली. यानंतर कोविड सेंटरमधील काही जणांनी सलीम याची समजूत काढली. परंतु, सलीम याने दोन साथिदारांना जणांना बोलावून नोडल ऑफिसर शिवाजी सर्जेराव नाईकवाडे यांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी शिवाजी नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून सलीमसह ३ जणांवर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात २१९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
जालना जिल्ह्यात रविवारी २१९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, एका रुग्णाचा मृत्यू झाला. ६६ रुग्णांस डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जालना तालुक्यातील जालना शहर ११६, माळी पिंपळगाव ०१, इंदेवाडी ०२, दहिफळ काळे १, हिवरा १, नेर ४, बोरखेड २, खापरखेडा, दादावाडी, सावरगाव, अंतरवाला, हिवरा रोशनगाव, टाकरवन, पठण बु., वाघुळ, गोंदेगाव, पळसखेडा १, शेवगा, मंठा तालुक्यात मंठा शहर, बेलोरा २, उसवद १, वाई २, परतूर तालुक्यातील वाटूर ४ यासह २१९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!