Share

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार असल्याचा भाजपचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- मागील काही दिवसांपासून वीज बिलाचा मुद्दा चर्चेत असतानाच हा निर्णय घेण्यात आला असून, वीज दरात जवळपास २ टक्के कपात करण्याचे आदेश आयोगाने वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. ही दर कपात १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे.राज्य वीज नियामक आयोगानं दर कपातीचा निर्णय घेतला असून, तसे आदेश वीज वितरण कंपन्यांना दिले आहेत.

दरम्यान, आता या मुद्यावरून देखील श्रेयवादाची लढाई समोर झाली आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या वेगवेगळया निर्णयांमुळेच 1 एप्रिलपासून वीज ग्राहकांना 2 टक्के स्वस्त दराने वीज मिळणार आहे. सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुढील पाच वर्षातील वीज उत्पादन व खरेदी संदर्भातील अहवाल वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची पध्दत सुरू झाली. त्यानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये हा अहवाल आयोगासमोर सादर केला. या अहवालाला मार्च 2020 मध्ये आयोगाने मंजूरी दिली. या अहवालात 1 एप्रिल 2021 पासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी करता येईल असे नमूद केले होते. ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध व्हावी यासाठी फडणवीस सरकारच्या काळात अवलंबिलेल्या धोरणाचे हे फलित आहे.

बावनकुळे म्हणाले की, फडणवीस सरकार सत्तेत असताना पाच वर्षाच्या कालावधीत ऊर्जा खात्याच्या धोरणात बदल करताना भारनियमन मुक्त महाराष्ट्र, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास असे धोरण ठेवून निर्णय घेतले गेले. राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवत ज्या कंपनीचा वीज दर कमी आहे त्या कंपनीकडूनच वीज विकत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे महावितरण, महा पारेषण या वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढली. परिणामी कंपन्यांचाही नफा होऊ लागला.

भाजपा सरकारने दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे जनतेला 1 एप्रिल पासून 2 टक्के स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे बावनकुळे यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!