मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. गेले तीन दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी राज्य सरकारवर आरोपांची सरबत्ती केल्याचं दिसून आलं. यानंतर, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने राम मंदिर निधी संकलनासाठी राबवलेल्या अभियानावर देखील टीकास्त्र सोडलं होतं.
दरम्यान, आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील याच मुद्द्यावर हात घालत भाजपला लक्ष्य केलं. 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला? त्याचा हिशेब भाजपने द्यावा असं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे. याच दरम्यान सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब देखील करावं लागलं आहे.
नाना पटोले म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु असताना मी काल उपस्थित नव्हतो. पण काल भाजप नेत्यांनी जे मुद्दे मांडले त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत आहे. एका व्यक्तीनं आपली भेट घेतली आणि राम मंदिरासाठी निधी देण्याबाबत आपल्याला त्रास दिला, धमकावलं. राज्य सरकारला माझा सवाल आहे, कोणत्या चॅरिटीच्या नावावर हे पैसा गोळा करत आहेत की प्रभू श्रीरामांनी भाजपला टोल वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय का ?’ असा प्रश्न त्यांनी केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी जय श्रीरामचे नारे लावत निषेध केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारला लाज वाटायला हवी’ इंधन दरवाढीवरून प्रकाश राज आक्रमक !
- श्रुती मराठेच्या अदांवर चाहते घायाळ ; सोशल मीडियावर श्रुतीचा जलवा !
- अहमदपूरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा एकर उस जळून खाक
- पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट; भाजपच्या ‘या’ नेत्याने पूजाचा लॅपटॉप चोरल्याची चर्चा
- संचारबंदी काळात व्यापाराना दिलासा देणारी बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
