पुणे– 22 वर्षीय पूजा चव्हाणचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपावला होता.
शिवसेनेच्या बड्या नेत्याचे नाव आल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.भाजपच्या महिला आघाडीने या प्रकरणी राज्यभर आंदोलने केली.भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे दिसून आले आहे.
राज्यभर हे प्रकरण गाजत असताना आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे.एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या एका नगरसेवकाचे आता या प्रकरणात नाव आले आहे. या नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वानवडीचे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी लॅपटॉप चोरल्याचा आरोप आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणी दाखल गुन्ह्यात देखील त्यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.
पुजा चव्हाणचा पुण्यातील वानवडी भागातील इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्या इमारतीच्या समोरच धनराज घोगरे यांचे घर आहे. पुजा जेव्हा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली तेव्हा तीला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांमध्ये अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याबरोबर धनराज घोगरे हे देखील होते. मात्र पुजाच्या मृत्यूनंतर अरुण राठोड आणि विलास चव्हाण जसे गायब झाले तसा पुजाचा लॅपटॉप देखील गायब करण्यात आला.
हा लॅपटॉप जेव्हा पुजावर उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता तेव्हा धनराज घोगरे यांनी चोरल्याचा आरोप आहे. या लॅपटॉपमध्ये संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता आहे.धनराज घोगरे हेच पूजाचे फोटोज वगेरे व्हायरल करत नाहीत ना असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान,पुजा चव्हाणच्या मृत्युनंतर तीचा लॅपटॉप नगरसेवक धनराज घोगरे यांनी गायब केल्याचा आरोप करत याबाबत तशी तक्रार शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी बीड पोलिसांकडे दिलीय. सध्या हे नगरसेवक गायब झाले आहेत तसेच त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही,अशा लोकांना लाज वाटायला हवी’
- श्रुती मराठेच्या अदांवर चाहते घायाळ ; सोशल मीडियावर श्रुतीचा जलवा !
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! एकाच दिवसात वाढले ३७१ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
- महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी औरंगाबादच्या प्रियंका गारखेडेची निवड
- ‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
