औरंगाबाद : आज औरंगाबाद जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक सुरू आहे. मात्र, बैठक सुरू प्रारंभ होण्याला विलंब झाला. त्यातही जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके आल्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी आले नव्हते. हे पाहून उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड यांनी बैठकीचे सचिव रामप्रसाद लाहोटी यांना अध्यक्षा येण्याच्या आधी मुख्य कार्यकारी अधिकारी आले पाहिजे असे खडेबोल सुनावले.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी जिल्हा परिषदेत स्थायी समितीची सभा तब्बल दीड तास उशिरा सुरु झाली. परंतु दुपारी 2 वाजून 12 मिनीतापर्यंत अध्यक्षासह, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्य उपस्थित नसल्याने पदाधिकाऱ्यांना वेळेचे भान आहे का अशी कुजबुज उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.
दुपारी 1 च्या बैठकीला अध्यक्ष मीना शेळके, उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड हे 2 वाजून 13 मिनिटांनी सभागृहात आले तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे 2 वाजून 15 मिनिटांनी सभागृहात आले. यावर उपाध्यक्ष गायकवाड यांनी सचिवांना खडेबोल सुनावले.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- एसटी अधिकाऱ्याला शिवीगाळ; ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांना ठोकल्या बेड्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
