🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करून लागू करण्यात येईल. ही ‘एसओपी’ राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे.
https://www.facebook.com/AjitPawarSpeaks/posts/3778890785552017
याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.
‘त्या’ डॉक्टरची हकालपट्टी
दरम्यान, औरंगाबादच्या पद्मपुरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्नानंतर प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर हा अहवाल वरिष्ठापर्यंत पोहोचला असून महानगरपालिकेकडून डॉक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती औरंगाबाद आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
- ‘सर्वोच्च न्यायालयानेही सरकारच्या ‘देशद्रोही’ ठरविण्याच्या बेलगाम वृत्तीवरच बोट ठेवले’
- न्यूझीलंडमध्ये आम्ही 3 दिवसांत हरलो तेव्हा कुणी बोलले नाही? खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना कोहलीचे उत्तर
- रेल्वे प्रश्नासाठी मराठवाड्यातील खासदारांची एकजूट; रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
