Share

संचारबंदी काळात व्यापाराना दिलासा देणारी बातमी

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान सात दिवस केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असे आदेश देण्यात आले होते. दूध विक्रीला वेळेचे बंधन असेल, पेट्रोल पंप बंद राहतील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकारचे व्यवहार व बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. असे आदेश देण्यात आले होते. मात्र जिल्हा प्रशासन आता एक पाऊल मागे आले आणि त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात ७ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी संचारबंदीच्या काळात व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांचे व्यवस्थापक यांची असेल, असे यावेळी सांगण्यात आले.

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तीना भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला जाईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!