🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण विधानसभेतले नसून चौकातलं भाषण होतं, असं वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
दरम्यान यावेळी काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकरी उल्लेख केला यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवल होत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पद हे सन्मानीय पद आहे यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.
After hearing yesterday’s speech of Shiv Sena chief who is also the Maha CM..
I think it’s matter of time that Shiv Sena shud MERGE in the Congress officially!— Nitesh Rane (@NiteshNRane) March 4, 2021
त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण ऐकून शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे, ‘काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुखांचे भाषण ऐकल्यानंतर मला असे वाटले की, आता शिवसेनेची अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे,’ असे ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
आज एक 'कॉमेडी सम्राट' विधानसभेत पाहिला आणि ऐकला..
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही!"कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री"
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 3, 2021
काल देखील भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणशैलीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपहासाने नटसम्राट ही उपमा दिली. त्यावरुन देखील राणे यांनी ‘आज एक ‘कॉमेडी सम्राट’ विधानसभेत पाहिला आणि ऐकला…महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! “कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री” असे ट्वीट भाजपचे नेते नितेश राणे यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ताकारणात ‘ज्यांच्या हाती ससा तो पारधी’ तरी ‘पारध्याला वाटेल त्याची पारध’ असा अर्थ होत नाही’
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
