Share

करबुडव्यांची अजब शक्कल ! दोन महिन्यात मनपा करवसुलीचे दोन कोटींचे चेक बाऊन्स

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या वसुलीपथकाचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेक मालमत्ताधारक खात्यात रक्कम नसतांना तसेच चुकीची सही, रकमेत तफावत करून प्रशासनाची फसवणूक करत होते. काहीवेळा महापालिका कर्मचाऱ्यांसोबत मिलिभगत केली जात होती. मात्र प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता धनादेश वटला नाही तर जबर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सव्वा दोन महिन्यात २२८ धनादेश वटलेले नाहीत. त्याची रक्कम एक कोटी पाच लाख ३५ हजार एवढी आहे.

एक रुपयांपासून पुढील रकमेच्या धनादेशासाठी हा दंड लावला जाणार असून, शंभर ते दोन हजारांपर्यंतचा दंड वसुल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मालमत्ताधरकाबरोबरच कर्मचाऱ्याला देखील दंड लावण्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेची शहरात मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रशासनाने थकबाकी वसुल करण्यासाठी कारवाया सुरू केल्या आहेत.

बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या जात असून, ही कारवाई टाळण्यासाठी अनेक जण महापालिकेच्या पथकाची धनादेश देऊन बोळवण करत आहेत. अनेकांचे धनादेश बँकेत अपुरी रक्कम, चुकीची सही केली. अक्षरी रक्कम वेगळी व अंकातील रक्कम वेगळी, तारखेत चुका असणे, नॉन सीएसटीची धनादेश देणे, शाई बदल असणे, धनादेशावर सही नसणे यासह इतर कारणांमुळे बाऊंस होत आहेत.

त्यामुळे वसुली होऊनही महापालिकेच्या तिजोरीत रक्कम जमा होत नाही. उलट धनादेश अनादर प्रकरणी कारवाया करणे किंवा संबंधिताकडून रोखीने पैसे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात वेळ वाया जात आहे. त्यामुळे धनादेश वटला नाही तर संबंधितासह महापालिकेच्या कर्मचाऱ्याची चुकी असेल तर त्याला सुद्धा दंड आकारण्याचा ठराव मुख्य कर निर्धारक व संकलक उपायुक्त अपर्णा थेटे यांनी ठेवला होता. हा ठराव प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता मंजूर केला आहे.

दोन महिन्यात एक कोटीचे चेक बाऊन्स : बाऊन्स झालेल्या धनादेशाची दरवर्षी मोठी रक्कम असते. गतवर्षी सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचे धनादेश वटलेले नव्हते. तर गेल्या सव्वा दोन महिन्यात २२८ धनादेश वटलेले नाहीत. त्याची रक्कम एक कोटी पाच लाख ३५ हजार एवढी आहे. यातील ८९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तर काही जणांनी रक्कम भरल्याचे अपर्णा थेटे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!