Share

बीड डीसीसी प्रकरण, पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

Published On: 

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून निवडणुकीत अर्ज बाद केल्याप्रकरणी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपच्या आमदारांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातील सर्वच अर्ज बाद झाले, या मुळे सत्ताधाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. औरंगाबादसह इतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एक न्याय अन बीड जिल्हा बँक प्रकरणी दुसरा न्याय हे दिसत होते. या प्रकरणात काहीजणांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती .तब्बल अकरा जागेवरील अर्ज बाद झाल्याने निवडणूक होणार की, नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान या प्रकरणी राज्याच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत जिल्हा बँक प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांची उपस्थिती होती. जिल्हा बँक प्रकरणी आता थेट राज्यपाल यांच्याकडेच तक्रार झाल्याने सत्ताधाऱ्यांना या प्रकरणात अडचणी येऊ शकतात अशी चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!