🕒 1 min read
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ताधारी राजकीय पक्षातील बड्या नेत्यांची काही प्रकरणे बाहेर आल्याने महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का ? असा सवाल उपस्थित होत असताना आता आणखी एक असेच प्रकरण समोर आले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सुनीत वाघमारे वर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सुनीत वाघमारे हा काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ आहे. सुनीत वाघमारेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
सुनीत वाघमारे याच्याविरोधात एका 28 वर्षीय तरुणीने बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून मुंबईच्या भोईवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून तपासासाठी तो लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे.
सुनीत हा विवाहित आहे. पण त्याने आपल्या पत्नीशी पटत नसल्यामुळे घटस्फोट घेणार असल्याचे सांगून पीडित मुलीला नोकरी तसेच लग्न करण्याचे आमिष देऊन जाळ्यात ओढले.त्यानंतर पीडित तरुणीला घटस्फोट देण्यासाठी वकिलासोबत बैठक आहे असं कारण देऊन लोणावळा येथे घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.
पीडित तरुणीने नकार दिला असता जीवे मारण्याची धमकी देऊन स्वत: आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन सुनीतने बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला असा आरोप करण्यात आला आहे.यानंतर या वाघमारेनं पीडित तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचे सांगून मुंबईत एक फ्लॅट सुद्धा भाड्याने घेऊन दिला होता. त्यानंतर वारंवार तिच्यावर अत्याचार केला.
काही दिवसांनी पीडितेनं लग्नाचा तगादा लावल्यामुळे सुमीतने पीडितेला मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुनीत विरोधात तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी सुनीत वाघमारे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पूजा चव्हाणा आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीमाना दिला. आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. यातच आता हा प्रकार उघडकीला आला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, ही बाब समोर येताच कॉंग्रेस पक्षाचा आणि सुनीत यांचा काहीही संबध नसल्याचे सांगत हात वर केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहितसह ‘हे’ खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून होऊ शकतात बाहेर
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

