Share

टीम इंडियानं घाबरू नये, चौथ्या कसोटीसाठी ‘fair pitch’ तयार करावे ; शोएब अख्तरचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

भारत आणि इंग्लंड  यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली. या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या सीरिजची चौथी आणि अखेरची टेस्टही याच मैदानात खेळवली जाणार आहे, त्यामुळे या मॅचसाठीचं पिच कसं असेल, याबाबत कयास बांधले जात आहेत.अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय.

खेळपट्टीवरून अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली आणि त्यात आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याचाही समावेश झाला आहे. भारतीय संघानं घाबरण्याची गरज नाही आणि चौथ्या कसोटीसाठी ‘fair pitch’ तयार करावे, असा सल्ला त्यानं दिला आहे.

अहमदाबाद कसोटी दोन दिवसांत संपल्यानंतर प्रत्येकजण खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत आहे. या खेळपट्टीवर ३० विकेट्सपैकी २८ बळी हे फिरकी गोलंदांजी घेतल्या. आश्चर्याची बाब म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं ८ धावांत ५ विकेट्स घेत इंडियाला धक्के दिले. भारतानं हा सामना १० विकेट्स राखून जिंकला. अख्तरनं त्याच्या यूट्युब चॅनेलवर मत मांडताना टीम इंडियाला चौथ्या कसोटीत इंग्लंडचा सामना करताना घाबरण्याची गरज नाही, त्यांनी योग्य खेळपट्टी तयार करुन मैदानावर उतरावे, असा सल्ला दिला.

तो म्हणाला,”अशा खेळपट्टीवर कसोटी मॅच खेळवली गेली पाहिजे?, अजिबात नाही. त्या खेळपट्टीवर प्रमाणापेक्षा जास्त फिरकी होत होती, त्यामुळे तो सामना दोन दिवसांत संपला. कसोटी क्रिकेटसाठी हे चांगलं नाही. घरच्या मैदानाचा फायदा मिळायलाच हवाच, परंतु त्याचा अतिरेक नसावा. भारतानं ४०० धावा केल्या असत्या आणि इंग्लंड २०० धावांवर बाद झाला असता, तर इंग्लंडचा संघ खराब खेळला असं आपण म्हटलं असतं. पण, इथे भारतीय संघही १४५ धावांत गारद झाला.”

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली, त्यामुळे त्यांना घरच्या मैदानावर खेळताना घाबरण्याची आणि अशा प्रकारची खेळपट्टी तयार करण्याचीही गरज नाही, असेही अख्तर म्हणाला. ”भारतीय संघ तगडा आहे. फेअर प्ले आणि फेअर पिच तयार करूनही टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करू शकते. तुम्ही प्रामाणिक खेळ करा,”असेही तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!