🕒 1 min read
मुंबई : विदर्भ आणि मराठवड्यातील जनतेचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महमंडळाच्या मुद्यावरून अधिवेशनात चांगलीच चर्चा रंगली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असे अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
त्यानंतर अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, ‘कॅबिनेटने एक निर्णय घेतलेला आहे. १२ नावं विधानपरिषदेची राज्यपाल महोदयांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत. अधिवेशन दहा दिवसांचं झालं पाहिजे असं सुधीर मुनगंटीवारजी म्हणाले. दस नंबरी झालं पाहिजे असंही म्हणाले. आणखी कुठलाही आकडा घ्या. ज्यादिवशी बारा नावं जाहीर होतील त्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळ जाहीर घोषित केलं जाईल’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
विधानसभा: १२ आमदारांसाठी वैधानिक विकास मंडळ ओलिस ठेवता ❓
विदर्भ-मराठवाड्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही ❗
वाटेल तो संघर्ष करू आणि आमच्या हक्काचे घेऊ, आम्ही भिकारी नाही ❗ pic.twitter.com/GpsInQMoey— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 1, 2021
अजित पवारांच्या निवेदनावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. १२ आमदारांकरता विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवलं आहे. किती राजकारण? विदर्भ-मराठवाड्याचं कवच नसतं तर कसं लुटून नेलंय ते आम्ही सभागृहात वारंवार मांडलं आहे. वैधानिक विकास महामंडळं आमच्याकडे होती म्हणून तुम्हाला बजेट पुन्हा मांडावं लागलं होतं. बजेटमध्ये विदर्भ-मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते. ते १२ करतील तर आम्ही हे करू असं कसं? राज्यपाल आणि तुमचा विषय आहे. सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय देणंघेणं आहे?
‘राज्यपाल हे कुठल्या पक्षाचे आहेत का? त्यांना घटनात्मक अधिकार आहेत. आज तुम्ही जे बोलला आहात, दादा तुम्हाला विनंती आहे की असं बोलू नका. विदर्भ-मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही. बारा आमदारांकरता तुम्ही मराठवाडा-विदर्भच्या जनतेला ओलीस ठेवणार का?
महत्त्वाच्या बातम्या
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन
- बीड जिल्ह्यातून राम मंदिरासाठी १ कोटी ४३ लाखांची देणगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
