🕒 1 min read
बीड : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुजाच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेऊन एक विनंती पत्र दिल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
यावेळी पूजाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देत माझ्या मुलीची व माझी बदनामी थांबवावी अशी विनंती देखील केली होती. मात्र, आज पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.
‘ज्या आई-वडिलांना पैशांसमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. ‘ असा गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे.
यावर पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘कोण काय बोलतंय ते माहीत नाही. आम्ही आमच्या दुःखात आहे. इतकंच नाही तर शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत’ असा खुलासा त्यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांना भावनिक आवाहन देखील केलं आहे. ‘मी आता थकलोय कृपया आता तरी बदनामी थांबवा,’ असं कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होतेय आणि आमचे मुख्यमंत्री सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान देतायत !’
- मोदीसाहेब, आता ‘माकडावस्थेत’ जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…?
- …तर धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे
- अजित पवार यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, पंकजा मुंडेंचा घणाघात
- ‘ते’ माझाही जीव घेणार, पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
