Share

मोदीसाहेब, आता ‘माकडावस्थेत’ जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सर्वसामान्यांना मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे, कारण एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसलेली असतानाच आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती २५ रुपयांनी वाढवल्या आहेत. चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती.

आता २५ रुपयांची वाढ झाल्याने १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये ८१९ रुपये एवढी झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होत आहेत. याआधी २५ फेब्रुवारीला २५ रुपयांनी वाढ केली होती. तसेच, ४ फेब्रुवारीला सुद्धा २५ रुपयांनी वाढ केली होती. तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढवले होते. दरम्यान, दररोज, पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर आर्थिक भार वाढत असतानाच गॅस दरवाढीमुळे अधिकचा चटका सामान्यांना सहन करावा लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या दरवाढीचा निषेध करत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये वाढ झाली ही अनुक्रमे 25,50,25 इतकी वाढवली गेली.’

‘स्वातंत्र्यनंतर च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली. हे कमी होते म्हणून की काय आज 1 मार्च रोजी पुन्हा 25 रुपयांनी गॅस दर वाढ सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांनी केली आहे. पंतप्रधान मोदीसाहेब, आपण देशावर अशी वेळ आणली आहे की आता ‘अश्यमयुगात’ सुद्धा नको तर मानवाची उत्पत्ती ज्याच्या पासून झाली त्या “माकडवस्थेत” जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…?’ असा संतप्त सवाल देखील रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!