मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला.
दरम्यान, आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा असं वाटतं का ? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा असं मत व्यक्त केलं आहे.
‘धंनजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात जी भाजपची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे. त्यांनी स्वतःच दायित्व ठेवून, जर सत्य आणि असत्य करण्याची शक्ती असेल तर त्यांनी देखील राजीनामा देण्याचा निर्णय घ्यायला हवा. त्यांच्यामुळे जर पक्षाला त्रास होणार असेल वा चुकीचं उदाहरण निर्माण होत असेल तर हा निर्णय घ्यायला हवा. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही’ असं भाष्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होतेय आणि आमचे मुख्यमंत्री सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान देतायत !’
- मोदीसाहेब, आता ‘माकडावस्थेत’ जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…?
- अनेक जेष्ठ नेते लस घेत असताना ‘या’ नेत्याने कोरोनाची लस घेणार नसल्याचं केले जाहीर
- अजित पवार यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, पंकजा मुंडेंचा घणाघात
- ‘ते’ माझाही जीव घेणार, पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
