🕒 1 min read
नवी दिल्ली- आजपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या, टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वयाने ज्येष्ठ असलेल्या अनेक नेत्यांनाही लस देण्यात येत आहे.
याच दरम्यान हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज हे कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी झाले होते. ट्रायलमध्ये त्यांनी कोरोना लस घेतली होती. पण आता जेव्हा प्रत्यक्षात लसीकरण सुरू झालं आहे, तेव्हा मात्र त्यांनी लस घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामागचं नेमकं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.
आज आम जनता के लिए कोरोना वैक्सीन शुरू होने जा रही है । सब को निस्संकोच लगवानी चाहिए । मैं तो नही लगवा पाऊंगा क्योंकि कोविड होने के बाद मेरी एंटीबाडी 300 बनी है जोकि बहुत ज्यादा है । शायद मैंने जो ट्रायल वैक्सीन लगवाई थी इसमे उसका भी योगदान हो । मुझे अभी वैक्सीन की जरूरत नही है ।
— Anil Vij Minister Haryana, India (@anilvijminister) March 1, 2021
‘आज सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. निसंकोचपणे लस घ्या. मला लस घेता येणार नाही कारण कोरोना इन्फेक्शन झाल्यानंतर माझ्या शरीरातील अँटिबॉडी 300 झाल्या आहेत आणि या भरपूर आहेत. कदाचित ट्रायलमध्ये मी लस घेतली त्यामुळे माझ्या शरीरातील अँटिबॉडी वाढल्या असाव्यात. आता मला लस घेण्याची गरज नाही’असं अनिल वीज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज कोरोनाची लस घेतली आहे. सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे.
मोदींनी एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पालिका भूमिकेवर ठाम! १ एप्रिलपासून लागू होणार परवाना शुल्क
- शरद पवारांपाठोपाठ लेक सुप्रिया सुळेंनी देखील घेतली कोरोना लस
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन
- बीड जिल्ह्यातून राम मंदिरासाठी १ कोटी ४३ लाखांची देणगी
- ‘आप’चे अनोखे आंदोलन, नाल्यावर पालिकेचा दशक्रिया करून पिंडदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
