Share

पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्या; गजा मारणेवर दरोड्याचा गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणे उर्फ गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.

दरम्यान, सध्या अटकेच्या भीतीने गजा मारणे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. बेकायदा जमाव जमवला, सरकारी कामात अडथळा आणला तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकेच्या भीतीने मारणे फरार झाल्याचे पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,उर्से टोलनाक्यावरील दुकानातून पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,टोलनाक्यावरील फुड मॉलमध्ये पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याचे समोर आले आहे.

त्यावरून गजा मारणेसह साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला. दरम्यान,नागरिकांमध्ये दहशत माजवत कायदा आणि सुव्यस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुंडांविरोधात यापुढील काळात कठोर कारवाई यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!