🕒 1 min read
पुणे : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुजाच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेऊन एक विनंती पत्र दिल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. हे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले.
पूजाच्या कुटुंबियांचे पत्र सार्वजनिकपणे वाचून दाखवल्याने भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे पत्र वाचून दाखवणे, यापेक्षा पुरोगामी महाराष्ट्राची दुसरी मोठी अधोगती असू शकत नाही. शिवसेनाप्रमुख आणि प्रबोधनकारांनी ओळख दिला तो “ठाकरी बाणा” खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ?’ असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे पत्र वाचून दाखवणे, यापेक्षा पुरोगामी महाराष्ट्राची दुसरी मोठी अधोगती असू शकत नाही. शिवसेनाप्रमुख आणि प्रबोधनकारांनी ओळख दिला तो "ठाकरी बाणा" खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ? एखाद्या पिडितेच्या पालकांचा
— Shivaray Kulkarni ( मोदी का परिवार ) (@ShivarayK) March 1, 2021
‘एखाद्या पिडितेच्या पालकांचा आक्षेप नाही म्हणून नराधमांना खुली छूट देण्याचा पायंडा तुम्हाला पाडायचा का ? तक्रार नाही म्हणून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांना तुम्ही कुलूपबंद करणार का ? भाजपाच्या दबावात तुम्ही राजीनामा तर घेतला पण प्रत्यक्षात तुम्हाला पूजाला न्याय द्यायचा नाही आणि कथित गबरुला क्लिन चिट द्यायची, या मानसिकतेचे तुम्ही जाहीर दर्शन घडवले. राठोडपेक्षा आपलीही मानसिकता वेगळी नाही ! अक्षम्य ! अखेर सुसंस्कृतपणा ढोंगाचा बुरखा फाटलाच !’ असा घणाघात शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे.
चिट द्यायची, या मानसिकतेचे तुम्ही जाहीर दर्शन घडवले. राठोडपेक्षा आपलीही मानसिकता वेगळी नाही ! अक्षम्य ! अखेर सुसंस्कृतपणा ढोंगाचा बुरखा फाटलाच !@Dev_Fadnavis @ChDadaPatil @ChitraKWagh @cbawankule @BJP4Maharashtra @ABPNews @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @Madhavbhandari_
— Shivaray Kulkarni ( मोदी का परिवार ) (@ShivarayK) March 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘आप’चे अनोखे आंदोलन, नाल्यावर पालिकेचा दशक्रिया करून पिंडदान
- खाजून आवधान! जामीन मिळताच फिर्यादीच्या घरासमोर फोडले फटाके, पुन्हा ॲट्रॉसिटी दाखल
- राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे अधिवेशन सुरु होण्याआधी शरद पवारांच्या भेटीला
- हिंगोली जिल्ह्यात आजपासून ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू; एसटीही बंद
- संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
