हिगोली : हळदीमध्ये कुरकुमीन घटकाचे प्रमाण वाढवण्यासाठी विद्यापीठांच्या माध्यमातून संशोधन करून नवीन वाणांची निर्मिती करण्याच्या सूचना पुणे येथे झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. हिंगोली येथे नव्याने स्थापन होणाऱ्या हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळाच्या हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक पुणे येथे झाली.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समितीचे सदस्य तसेच कृषी आयुक्तालयातील अधिकारी व विद्यापीठातील तज्ञांची उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. हळद उत्पादनाच्या संदर्भात कोणते उद्योग उभारता येतील यावर चर्चा यावेळी करण्यात आली.
हिंगोलीत मोठ्या प्रमाणात हळदीचे पिक घेतले जाते. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्यासाठी केला जातो. तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्येही उपयोग केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो असे जाणकार सांगतात. त्यामुळे हळदीला मोठी मागणी असते. शेतकरी हळद पिकाला नगदी पीक म्हणून पसंती देतात.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये कोरोनाचे २५६ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू; ७१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
- डेटिंग साइटवर वाद झाल्याने पुण्यात जालन्याच्या तरुणाचा खून; दोन जण ताब्यात
- व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करणारे ५ जण अटकेत; दोन कोटींच्या खंडणीसाठी आखला प्लॅन
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
