लखनौ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लखनौ च्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज लखनौ येथे रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली.
यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मोदी सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. आता रामदास आठवले यांनी देशातील क्षत्रिय समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ‘ देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण देण्यात यावे,’ या मागणीचा आज त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
मायावती आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासाठी आरपीआयचे दरवाजे खुले
रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं आहे. इतकच नाही तर, ‘जर मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईल,’ असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- राठोडांवरील आरोपांवर इतके दिवस ठाकरेंनी शांत बसणं म्हणजे केवळ सत्तेची लालसा – भाजप
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- पूजाच्या मृत्यूनंतर संजय राठोडांनी केल्या ‘या’ चुका, त्यामुळे द्यावा लागला राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
