🕒 1 min read
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रीपद गमवावे लागले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. राजीनाम्यानंतर ‘हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा होता’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, याचवेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तुमची भूमिका काय राहणार असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी वेळ मारून नेल्याचे पाहायला मिळाले.
फडणवीस म्हणाले, ‘अशा प्रकारच्या जेवढ्या घटना असतील त्या सगळ्या प्रकरणात आम्ही आक्रमक भूमिका मांडणार. पण एक लक्षात ठेवा, भाजप आक्रमक आहे. आक्रस्ताळा नाही. वस्तूस्थितीच्या आधारावर भाजप आंदोलन करत राहील’ असे फडणवीस यांनी सांगितले.
दुसरीकडे पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र धनंजय मुंडे प्रकरण वेगळं असल्याचं म्हटलं आहे. राठोड यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. पण धनंजय मुंडे प्रकरणाबाबत बोलताना मात्र त्यांनी दोन प्रकरणांची तुलना करता येणार नाही असं म्हटले आहे. ‘तुम्ही धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणात गल्लत करू नका’ असं चित्रा वाघ म्हणाल्यात.
महाविकास आघाडी सरकारमधील हा पहिला राजीनामा असल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने गेल्या काही काळात आरोप झालेल्या इतर मंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गुन्हा दाखल होऊन शिक्षा मिळाल्यावरच पूजाला न्याय मिळेल’
- ‘राजीनामा दिलाय, पण राज्यपालांकडे पाठवू नका’, मुख्यमंत्र्यांसमोर जोडले हात
- ..तर संजय राठोड यांना आमदारकीही सोडायला सांगू-महंत जितेंद्र महाराज
- उल्टी गिनती सुरू! संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली
- गैरसोय दूर होणार, अहमदनगर-औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
