Share

‘गुन्हा दाखल होऊन शिक्षा मिळाल्यावरच पूजाला न्याय मिळेल’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेच्या संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आत्महत्या प्रकरणात नाव आल्याने त्यांच्या विरोधात भाजपने तीव्र आंदोलन केले होते. त्यामुळे भाजपच्या दबावाला झुकत राठोडांनी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, फक्त राजीनामा दिला म्हणून हे प्रकरण थांबणार नाही. पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करावा, त्यांना शिक्षा व्हावी तरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल अशी मागणी पुण्यातील भाजप पदाधिकारी डॉ.पुनम राऊत यांनी केली आहे.

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत. त्यामुळे फक्त राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करावा लागेल. योग्य तपास केला तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांचा राजीनामा त्वरित स्वीकारावा अशी मागणी पुनम राऊत यांनी केली आहे.

डॉ.पुनम राऊत या भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड येथील ओबीसी मोर्चा प्रदेश युवती आघाडीच्या संपर्क प्रमुख आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राऊत मुख्यमंत्र्यांना संजय राठोडवर कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. तसेच पूजाच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्रत्यक्ष भेटून केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!