Share

‘राजीनामा दिलाय, पण राज्यपालांकडे पाठवू नका’, मुख्यमंत्र्यांसमोर जोडले हात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘मरता क्या न करता’ पूजा चव्हाण प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्याची माहितीही मिळत आहे. पण असे असले तरी राठोड अजूनही हार मानण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्राचा वापर राठोड करत असल्याचे कळतेय. ‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी आपण पदावरुन दूर झाल्याचं राठोड यांनी पत्रकारांना सांगितले. राठोड यांनी सपत्निक वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पण हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळत आहे.

संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. संजय राठोड यांचा दबावतंत्राचा काही उपयोग होणार का की मुख्यमंत्री तटस्थ निर्णय घेतील ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे विरोधी पक्षांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!