Share

पूजाच्या मृत्यूनंतर संजय राठोडांनी केल्या ‘या’ चुका, त्यामुळे द्यावा लागला राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हो नाही म्हणता शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. भाजपने हा मुद्दा अजेंड्यावर आणत महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडले होते. संजय राठोड यांच्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठाही खालावली जात होती. मात्र, ‘मातोश्री’वरील दबावापुढे झुकत संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, पूजाच्या मृत्यूनंतरही राठोड यांनी काही गोष्टी टाळल्या असत्या तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. त्यांनी काही चुका केल्या, ज्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. अशी कोणती कारणे आहेत, जाणून घ्या..

बेपत्ता झालेला अरुण राठोड
पूजाच्या मृत्यूनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात अरुण राठोड नावाचा व्यक्ती महत्त्वाचा साक्षीदार होता. त्याने स्वतः पोलिसांसमोर येऊन सर्व माहिती सांगणे गरजेचे होते. मात्र, या दरम्यानच्या कालावधीत अरुण राठोड बेपत्ता झाला. त्याला गायब करण्यात मंत्री संजय राठोड यांचाच हात असल्याचा आरोप झाला.

ऑडिओ क्लिप व्हायरल
पूजाने आत्महत्येपूर्वी तिचे संजय राठोड यांच्याशी मोबाईलवर अनेकदा बोलणे झाले होते, असा दावा भाजपने केला. त्या दोघांच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या. त्यामुळे संजय राठोड यांच्यासमोरील अडचणी वाढल्या. या ऑडिओ क्लिप माध्यमांच्या हाती लागल्याने संजय राठोड तोंडावर पडले.

क्लिपबाबत मौन बाळगले
संजय राठोड यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेवरही आक्षेप घेतला नाही. त्यांनी फोनमधील संभाषणाच्या क्लिप्स खोट्या, बनावट आहेत असे ते काहीही म्हणाले नाहीत. त्यामुळे भाजपचा दावा खरा ठरला. त्या अनुषंगाने पूजाच्या आत्महत्येला तेच जबाबदार असल्याचे चित्र समोर झाले.

स्वत: गायब झाले
पूजा चव्हाण आत्महत्येत संजय राठोड यांचे नाव आले. यानंतर त्यांनी आपली बाजू मांडली नाही. उलट अरुण राठोडप्रमाणे तेही गायब झाले. माध्यमांनी अनेक खटाटोप करून त्यांची प्रतिक्रिया देण्याबाबत प्रयत्न केले. मात्र, ते अनेक दिवस लपून राहिले. त्यामुळे ते दोषी असल्याचे अप्रत्यक्षिरत्या सिद्ध झाले. तोपर्यंत त्यांच्याविरोधात भाजपने महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडले.

शक्तीप्रदर्शन अंगलट आले
पूजाच्या मृत्यूनंतर तब्बल दोन आठवड्यांनी संजय राठोड सर्वांसमोर आले. पोहरादेवीच्या दर्शनाच्या निमित्ताने ते घराबाहेर पडले. मात्र, त्यांनी यावेळी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. मुख्यमंत्र्यांनी नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला संजय राठोड यांनी अक्षरश: कचऱ्याची टोपली दाखवून मोठी गर्दी जमवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून किंमत नसल्याची चर्चा सुरू झाली. यावरुन भाजपलाही आयते कोलीत मिळाले.

प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न
संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात जातीचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या मृत्यूनंतर १५ दिवसांनी ते माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोप म्हणजे ओबीसींविरोधातील षडयंत्र असल्याचे सांगितले. यामुळे पूजाच्या प्रकरणात आपला बचाव करण्यासाठी जातीय कार्ड खेळत असल्याचाही आरोप झाला. यामुळे राज्य सरकारवर टीका झाली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर यावरून चांगलाच हल्लाबोल केला. गुन्हे लपवण्यासाठी समाजाची ढाल करण्याचा नवा प्रकार राज्यात सुरू झाल्याची टीका त्यांनी केली.

पूजासोबतचा ‘तो मी नव्हेच’
संजय राठोड हे पूजाबद्दल काही बोलतील असे अपेक्षित होते. मात्र, पोहरादेवी येथे त्यांनी पूजाच्या मृत्यूबद्दल साधा शोकही व्यक्त केला नाही. यावेळी आपण कसे निर्दोष आहे हेच सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे राठोड यांना पूजाच्या मृत्यूबाबत कसलेही दुःख नसल्याचे पाहायला मिळाले. तो मी नव्हेच हे सांगण्यासाठी ते पोहरादेवीला आले आणि लोकांना भावनिक करण्याचा असफल प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!