🕒 1 min read
औरंगाबाद : पूजा चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणामध्ये राजीनामा द्यावे लागलेले विदर्भातील वनमंत्री संजय राठोड यांच्या जागेवर आता मराठवाड्यातील संजय शिरसाठ यांची वर्णी लागते का? याबाबत उत्सूकता आहे. २०१९ च्या मंत्रीमंडळ निवडतांना मराठवाड्यामधून मोठ्या ताकदीने मंत्री पदासाठी आलेले नाव म्हणजे आमदार संजय शिरसाठ हे होते. मात्र, त्यांना त्यावेळी संधी नाकारण्यात आली होती.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ हे तिसऱ्यांदा २०१९ च्या निवडणुकीत निवडून आले. महाविकास आघाडी स्थापन होऊन शिवसेनेने औरंगाबाद जिल्ह्याला दोन मंत्रीपद दिले. त्यातील सिल्लोड – सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार आणि पैठणचे आमदार संदीपान भूमरे यांचा समावेश होता. त्यातील सत्तार हे आयाराम आहेत. तसेच हे दोन्ही चेहरे ग्रामीण विभागातील आहेत. मात्र, निष्ठावंत आणि शहरी चेहरा असलेले शिरसाठ यांच्या रुपाने आणखीन एक मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा औरंगाबादकरांना आहे.
मराठवाड्यामध्ये तसेच औरंगाबादेत शिवसेनेची मोठी ताकद आहे. तर आता औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाठ यांना जर मंत्रीपद दिले गेले तर महानगर पालिका निवडणूकीसाठी खुप मोठा फायदा मिळू शकतो. हे देखील शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठी तसेच शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच माहित आहे. येणाऱ्या काही महिन्यात निवडणुका जर लागल्या तर औरंगाबाद शहरामध्ये एक विशेष असा फायदा शिरसाठ यांच्या माध्यमातून पुन्हा नवीन ताकद मिळेल.
जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद
औरंगाबाद जिल्हातील ९ विधानसभा मतदार संघापैकी एकट्या शिवसेनेचे ६ आमदार निवडून आलेले आहेत. यातील शहरातील तीन विधानसभा मतदार संघापैकी २ आमदार हे शिवसेनेचे आहेत. तसेच शहरात २५ वर्षांपासून महानगर पालिकेवर भाजप – सेना युतीच्या माध्यमातून शिवसेनेचे महापौर होते. शहरासह ग्रामीण भागामध्ये शिवसेनेची खुप मोठी ताकद आहे. तर आता शहराला गरजेचे आणि महत्वाचे असणारे मंत्रीपद शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या सत्तेमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादला झुकते माप देणार का ? याकडे औरंगाबादसह मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
