Share

..तर संजय राठोड यांना आमदारकीही सोडायला सांगू-महंत जितेंद्र महाराज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे. राज्य पातळीवर मोठ्या घडामोडींना वेग आला असतानाच पोहरादेवीच्या मंहंतांनी मुख्यंमंत्र्यांना पत्र लिहले आहे. संजय राठोड यांचा तडकाफडकी राजीनामा घेऊ नये अशी विनंती महंतांनी केली आहे. त्यांचा राजीनामा घेतल्यास शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगूत असे महंत म्हणालेत.

महंत जितेंद्र महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की, ‘पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. चौकशीतून सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये. जर त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला तर या ठिकाणी पोहरादेवीवरुन त्यांना आम्ही शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगू.’

दरम्यान, मी निर्दोष आहे म्हणणाऱ्या शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राठोड यांच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहभाग आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी होत असलेला दबाव यामुळे शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. पण उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ नाकारली आहे. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!