मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संजय राठोड यांच्या राजीनामा नाट्याला ब्रेक केव्हा लागणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे राजकीय गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या मार्गांनी पूजा चव्हाण आत्महत्येचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे संजय राठोड हे राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राठोड राजीनामा देतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहता वनमंत्री यांना अधिक काळपदावर ठेवणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे वनमंत्री राठोड यांनी स्वतः राजीनामा द्यावा असा दबाव सध्या त्यांचा वर असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे सरकारवरील वाढता दबाव लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे. ही बैठक होण्याआधी राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यावेळी दोघांमध्ये राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राठोड हे बंजारा समाजाचे महंत आणि बंजारा समाजाशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यासाठी ते पोहरादेवीला जाणार आहेत.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणामुळे ठाकरे सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच राठोड यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राठोड मंत्रिपदासोबतच आपल्या आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मनसेचा आता परप्रांतीय बोअर वेल्सविरोधात एल्गार
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
