Share

गुलाम नबी आझाद हे रिटायर व्हावेत अशी पक्षातील जेष्ठ नेत्यांची इच्छा नव्हती?

Published On: 

🕒 1 min read

जम्मू- राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. जी -23 मधील अनेक नेतेही त्यांच्यासमवेत आहेत. शनिवारी जम्मूमधील मोर्चाच्या वेळी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांचे स्वागत केले.

दरम्यान,नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. मात्र आझाद यांनी निवृत्ती घ्यावी अशी पक्षातील दिग्गज नेत्यांची इच्छा नव्हती का असा सवाल आज उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण आज जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीच यासंदर्भात एक वक्तव्य केले आहे.

कपिल सिब्बल म्हणाले की, गुलाम नबी आझाद हे रिटायर व्हावेत अशी आमची इच्छा नव्हती.जेव्हा त्यांच्या रिटायर होण्याबाबत समजले तेव्हा अतिशय दुखः आणि वेदना झाल्या. कॉंग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे आणि आता तो मजबूत करण्याची गरज आहे. ते म्हणाले की जेव्हा तुम्ही विमानात जाता तेव्हा तुम्हाला पायलटसह अभियंत्याची आवश्यकता असते ज्यास त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती असेल. गुलाम नबी आझाद हे कॉंग्रेसमध्ये याच भूमिकेत आहेत.

यानंतर कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही सिब्बल यांच्या सुरात सूर मिसळला. ते म्हणाले की, आझाद हे एक संकल्पित कॉंग्रेस नेते आहेत. कॉंग्रेस ज्यांना समजली अशा नेत्यांमध्ये आझादचाही समावेश आहे. गुलाम नबी आझाद यांच्या मार्गदर्शनाची कॉंग्रेसला आणि देशाला गरज आहे.

यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की मी संसदेतून निवृत्त झालो आहे पण राजकारणातून नाही. ही चिंतेची बाब नाही. मी बऱ्याच वेळा जबरदस्त पुनरागमन केले आहे. पंतप्रधान मोदींसह ज्यांनी माझे कौतुक केले त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.

गुलाम नबी आझाद यांच्या सन्मानार्थ कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद म्हणाले, आझाद साहेब निवृत्त झाले आहेत असे कोण म्हणत आहेत? ते राजकारणात सक्रीय असतील किंबहुना त्यांनी राजकारणात सक्रिय राहावे अशी आमची इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!