Share

दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थीचा योग; मात्र, राजुरेश्वराचे मंदिर राहणार बंद

Published On: 

🕒 1 min read

जालना : येत्या २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. मंगळवारी चतुर्थीचा हा योग तब्बल दीड वर्षानंतर जुळून आला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने १ ते २ मार्चपर्यंत राजुरेश्वराचे मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन गणपती संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र राजूर येथे अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखे भाविक येत असतातात. अंगारकी चतुर्थीला राजुरेश्वराच्या मंदिरापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग असते. जालना, भोकरदन, फुलंब्री, देऊळगावराजा या मुख्य रस्त्याने लाखो भाविक पायी येतात. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावने २ मार्च रोजीच्या अंगारकी चतुर्थीला भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन गणपती संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार संतोष गोरड यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणाता प्रादुर्भाव होतोया. या पार्श्वभीमीवर राज्य शासनाकडून गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातही सध्या जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्यामळे पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. तसेच विना मास्क दिसल्यास दंड आकारण्यात येत आहे. जालन्यातील एकून कोरोनाबाधितांचा आकडाही १५ हजार १४९ वर जाऊन पोहोचला आहे, तर या ३९० जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान १३ हजार ९३१ रुग्णांना आतापर्यंत यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आहे आहे. जिल्ह्यात सध्या ८२८ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!